बारामतीत ‘एसी’च्या मागणीत वाढ

बारामतीत ‘एसी’च्या मागणीत वाढ
Published on

बारामती, ता. २८ : शहरात एप्रिलमध्येच तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले असून, या तीव्र उष्णतेमुळे शहरात वातानुकूलित यंत्राच्या (एसी) मागणीत तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वाढत्या उकाड्यामुळे बारामतीची बाजारपेठ दुपारी ओस पडत असली, तरी इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मिलिंद ट्रेडींगचे समीर वाघोलीकर आणि महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्सचे मनोज सातव यांच्या मते, यंदा फेब्रुवारीपासूनच मागणी सुरू झाली असून, एप्रिलमध्ये तिने उच्चांक गाठला आहे. मध्यमवर्गीयांकडून प्रामुख्याने एक टन क्षमतेच्या एसीला पसंती दिली जात आहे. सुलभ हप्ते आणि वित्तीय योजनांमुळे ग्रामीण भागातील ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत.
नोबल मॉलचे मुस्तफा भोरी आणि प्रशांत मॉलचे प्रकाश नेवसे यांनी सांगितले की, ‘‘किमतीत ५ ते १० टक्के वाढ होऊनही विक्रीवर परिणाम झालेला नाही. वाढत्या मागणीमुळे एसी बसवणाऱ्या तंत्रज्ञांवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. काही ठिकाणी एसी बसवण्यासाठी दोन ते तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सुयश कोठारी व सुधीर पराडकर यांनी नमूद केले. दरम्यान, उष्माघाताचा धोका लक्षात घेता डॉक्टरांनी नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com