‘एलिव्हेटेड’चे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एलिव्हेटेड’चे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको
नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका
‘एलिव्हेटेड’चे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका

‘एलिव्हेटेड’चे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका

sakal_logo
By

चाकण, ता. ६ : नाशिक फाटा ते चांडोली दरम्यानच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत टोलवसुली नको, अशी भूमिका घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून टोलवसुली बंद करण्याची मागणी केली आहे.

दोन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही नाशिक फाटा ते चांडोली दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे गेल्या ८-९ वर्षांपासून नागरिक सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा टोल आकारल्यास जनक्षोभ होऊ शकतो, असा इशारा देऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी चौपदरीकरणाचा खर्च वसूल झाल्यानंतर गतवर्षी टोलआकारणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याच्या स्थितीत काहीच फरक पडलेला नाही, याकडे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या विचारात घेऊन मंत्री गडकरी टोलवसुली स्थगित करण्याचे आदेश देतील, अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.