Sun, Jan 29, 2023

चाकणला रस्त्यावर पडलेली मळी कार्यकर्त्यांकडून दूर
चाकणला रस्त्यावर पडलेली मळी कार्यकर्त्यांकडून दूर
Published on : 16 January 2023, 11:26 am
चाकण, ता.१५ : चाकण-शिक्रापूर मार्गावर रविवारी (ता. १५) सायंकाळी सातच्या सुमारास शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणाऱ्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीमधून मळी घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीमधून मळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडली. त्यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली. मार्गावरील मळी दूर करण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष धीरज मुटके यांनी दिली.
माजी उपनगराध्यक्ष धीरज मुटके यांना मिळताच त्यांनी त्वरित चाकण-शिक्रापूर मार्गावर येऊन इतर कार्यकर्त्यांना बरोबर घेतले व रस्त्यावरील मळी दूर करण्याचे काम केले. यासाठी धिरज मुटके, सुधीर कानपिळे यांनी व त्यांचे सहकारी चेतन मुटके, सुखदेव तागडे, किशोर कवालकर, अभिषेक लाळे आदींनी मळी दूर केली व वाहतूक कोंडी सुरळीत झाली.
04842