मोहितेवाडी परिसरात ट्रक चालकाला लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहितेवाडी परिसरात 
ट्रक चालकाला लुटले
मोहितेवाडी परिसरात ट्रक चालकाला लुटले

मोहितेवाडी परिसरात ट्रक चालकाला लुटले

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : मोहितेवाडी (ता. खेड) येथे ट्रक चालकाला मारहाण करून लुटल्याचा प्रकार रविवारी (ता. १२) दुपारी घडला.
मोहितेवाडी येथे चाकण-शिक्रापूर मार्गावर रविवारी दुपारी राजस्थान हरियाना मेवात या ढाब्याजवळ ट्रकची काच फोडून चालकावर चाकूने वार केले. तसेच, मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. याबाबत जयसिंग परशुराम पळसकर (वय ५०, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तीन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.