चाकण येथे सोन्याच्या दुकानातून दागिने लंपास

चाकण येथे सोन्याच्या दुकानातून दागिने लंपास

Published on

चाकण, ता. १० : येथील एका सोन्याच्या दुकानातून दोन अनोळखी महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने एकतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी दोन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात केला आहे. हा प्रकार शनिवारी (ता. ८) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडला. एका सोन्याच्या दुकानातून दोन अनोळखी महिलांनी खरेदी करण्याच्या बहनाने हातचलाखी करून स्वतःच्या आर्थिक फायदा करता एकतीस हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी रूपेश परदेशी (वय २९, वाकी खुर्द, ता. खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिलेली आहे. अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.