मोहितेवाडी येथे अपघातात दोघांचा मृत्यू

मोहितेवाडी येथे अपघातात दोघांचा मृत्यू

चाकण, ता. ११ : चाकण -शिक्रापूर मार्गावर मोहितेवाडीच्या (ता. खेड) हद्दीत कंटेनरला मोटारीने पाठीमागून धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात मोटारचालक आदित्य मेमाणे (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड) व त्याच्या शेजारी बसलेला अमोल व्यंकटराव लोमटे (वय ३२) या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता.) रात्री बाराच्या सुमारास झाला.
याप्रकरणी मृत मोटारचालकावर भरधाव वेगात वाहन चालविणे तसेच व दुसऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com