विनापरवाना कीटकनाशके 
तयार करणाऱ्यावर गुन्हा

विनापरवाना कीटकनाशके तयार करणाऱ्यावर गुन्हा

Published on

चाकण, ता. २६ : कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील एका खासगी कंपनीत विनापरवाना तीन लाख सत्तर हजार आठशे रुपयांची कीटकनाशके तयार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

शांतीश्वर विलास पाटील (वय ४५ रा. भोसरी, पुणे) याच्यावर कीटकनाशके अधिनियम कलमानुसार, तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कुरुळी गावच्या हद्दीत शील्ड लाइफ सायन्सेस अँड रेजिन्स प्रा. लिमिटेड या कंपनीत मंगळवारी (ता. २५) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी फिर्यादी दत्ता शेटे (वय ४२, रा. पिंपरी, पुणे) यांनी दिल्यानंतर याप्रकरणी आरोपी शांतीश्वर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.