चाकणला फळभाज्यांचे बाजारभाव कडाडले

चाकणला फळभाज्यांचे बाजारभाव कडाडले

चाकण, ता. २: चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रतिकिलोस पाच रुपयांनी वाढ झाली. कांद्याला घाऊक बाजारात रविवारी (ता.२) प्रतिकिलोला किमान तेरा रुपयांपासून २० ते २६ रुपये बाजारभाव मिळत आहे. सध्या पावसाचे आगमन उशिरा होत असल्याने फळभाज्यांचे बाजारभाव मात्र कडाडले आहेत. हिरव्या मिरचीची दिल्लीतून सुमारे तीस टन आवक झाली. तिला प्रतिकिलोला चाळीस ते साठ रुपये बाजारभाव मिळाला.

बटाट्याची सुमारे साडेबाराशे क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिकिलोला सुमारे १९ ते २४, २७ रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची मोठी आवक होत आहे. या बटाट्याला मोठी मागणी आहे.
टोमॅटोला प्रती किलोला दहा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला. टोमॅटोची आवक सुमारे तीस टन झाली. टोमॅटोच्या भावात पंधरा ते वीस रुपयांनी गेल्या दोन महिन्यांपासून घट झाली आहे. टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
चाकण, ता. खेड येथील महात्मा फुले बाजारात आज ता.२ ला लसणाची आवक गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या परराज्यातून झाली.ही आवक पन्नास टन झाली. लसणाचे भाव प्रती किलोला १२० ते १७० रुपये आहे. लसणाच्या भावात पुन्हा ६० ते ८० रुपयांनी वाढ झाली आहे.लसणाची भाव वाढ स्थिर आहे.

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव पुढील प्रमाणे : हिरवी मिरची - ४० ते ६०, परवल -५०, हिरवा वाटाणा - ८० ते १००, भेंडी -३५ ते ४५, टोमॅटो - १० ते २०, गवार -२० ते ४०, फ्लॉवर १० ते २०, कोबी ५ ते १०, दुधी भोपळा ५ ते १५, वांगी -२० ते ३०, काकडी -१० ते २०, गाजर १५ ते २५.

कोथिंबीर, मेथीची आवक घटली
कोथिंबीर, मेथीची आवक सध्या घटली आहे. मेथीची एक जुडी १० ते १६ रुपयाला विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी २५ ते ३५ रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी १० ते २० रुपयाला विकली गेली. पालकची एक जुडी १०ते १५ रुपयाला विकली गेली. उन्हाळी हंगामामुळे काही फळभाज्यांचे बाजारभाव वाढत आहेत तर काहींचे बाजारभाव घसरत आहेत, असे व्यापारी, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, संजय वहिले, आबा गोरे, गणेश झगडे, भानुदास टेंगले, धनंजय बोराटे आदींनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com