चाकणला कोथिंबिरीचा बाजारभाव घसरला

चाकणला कोथिंबिरीचा बाजारभाव घसरला

Published on

चाकण, ता. ७ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजार कोथिंबिरीच्या जुड्यांची सुमारे आवक २५ हजारांपेक्षा अधिक झाली. पंचवीस, तीस रुपयांवर गेलेला कोथिंबिरीच्या एका जुडीचा बाजारभाव रविवारी (ता. ७) दहा रुपयांवर आला. पावसाने पुन्हा आगमन केल्याने कोथिंबिरीचे बाजारभाव घसरले. मात्र टोमॅटोची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढ झाली. घाऊक बाजारात टोमॅटो ६० ते ७० रुपये प्रतिकिलो विकले गेले.

बाजारात कर्नाटक राज्यातून सुमारे वीस टन हिरव्या मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीचे बाजारभाव घाऊक बाजारात प्रतिकिलोला ५० ते ७० रुपये राहिले. टोमॅटोची सुमारे वीस टन आवक झाली. टोमॅटो शंभरी गाठतील अशी शक्यता शेतकरी, व्यापारी यांच्याकडून वर्तविली जातं आहे. कांद्याची सुमारे १०५० क्विंटल आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २० ते तीस रुपये भाव मिळाला.भावात दोन रुपयांनी घसरण झाली. बटाट्याची सुमारे दोन हजार क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिकिलोला सुमारे २५ ते ३० रुपये भाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे,सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
चाकण बाजारात लसणाची आवक गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या परराज्यातून तीस टन आवक झाली. लसणाला प्रतिकिलोला १००ते १७० रुपये बाजारभाव मिळाला.

फळभाज्यांचे एका किलोचे बाजारभाव पुढील प्रमाणे : हिरवी मिरची-५० ते ७०, परवल -५०, हिरवा वाटाणा-१००, भेंडी -७०, गवार- ४० ते ६०, फ्लॉवर २० ते ३०, कोबी २० ते ३०, दुधी भोपळा - १५ ते २०, चवळी-२५ ते ३५, शेवगा-५० ते ७०, ढोबळी मिरची-५० ते ६०, डांगर भोपळा -४० रुपये, वांगी -२० ते ३० रु., काकडी -२०, गाजर २० ते २५ रुपये.

कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पंचवीस हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीर, मेथीची आवक सध्या घटली आहे. मेथीची एक जुडी १० ते २० रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी १० ते २० रुपयाला विकली गेली. पालकची एक जुडी १० ते १५ रुपयाला विकली गेली.


07200

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.