चाकणच्या रस्त्यांची अवस्था बिकट

चाकणच्या रस्त्यांची अवस्था बिकट

Published on

चाकण, ता. ७ : येथील जुना पुणे-नाशिक महामार्ग असो की चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव या मार्गांची अवस्था सध्या बिकट आहे. या मार्गांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केली जातात. परंतु, ती कामे निकृष्ट दर्जाची असतात, आणि पावसाळा आला की, त्या रस्त्यांना खड्डे पडतात. त्यामुळे या मार्गांकडे कोणी लक्ष देत नाही, अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे नागरिक, कामगार, व्यावसायिक संताप व्यक्त करत आहेत.

चाकण (ता. खेड) येथील जुन्या पुणे-नाशिक महामार्गाचे काम सात-आठ वर्षांपूर्वी झाले. या मार्गाचे काम एक कोटी रुपयांवर खर्चाचे झाले. या मार्गांची कामे निकृष्ट दर्जाची झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच ठेकेदाराने या कामाकडे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांचा आहे. या रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, आणि मार्गांचे काम निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे याकडे कोणी लक्ष देत नाही का? असा सवाल नागरिकांचा, कामगारांचा आहे. जुन्या पुणे-नाशिक मार्गाचे काम कॉंक्रिटीकरणाचे केले गेले. त्यावेळेस त्या मार्गांची रुंदी वाढविली नाही. या मार्गांवरील पर्यायी मार्ग नगरपरिषदेने केले. परंतु, तेही काम ठेकेदारांनी निकृष्ट पद्धतीने केले, असा आरोप नागरिकांचा आहे.

जुना पुणे-नाशिक मार्ग चाकण नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या मार्गांची देखभाल, दुरुस्ती चाकण नगरपरिषदेने करावयाची आहे.
- संतोष पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.