चाकण येथे बेकायदा रिक्षांचा सुळसुळाट

चाकण येथे बेकायदा रिक्षांचा सुळसुळाट

चाकण ता. ११ : येथील (ता. खेड) पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव, आंबेठाण, माणिक चौक, एमायडीसी चौकात अगदी रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. बेकायदा रिक्षाचालक इतर वाहनचालकांना दादागिरी करत असल्याने त्या रिक्षा रस्त्यावरून हलत नाहीत. यामुळे सतत वाहतूक कोंडी होते.

बेकायदा रिक्षांच्यावर कोणाची लाखो रुपयांची हप्तेगिरी चालते? असाही प्रश्‍न नागरिक तसेच वाहनचालकांना पडला आहे. पुणे- नाशिक महामार्गावर चाकण, तळेगाव चौकात बेकायदा रिक्षा मोठ्या प्रमाणात भोसरी -चाकण, चाकण- राजगुरुनगर, चाकण- तळेगाव चाकण- शिक्रापूर या मार्गावर दररोज ये-जा करतात. या मार्गावर सुमारे पाच हजारावर रिक्षा आहेत. या रिक्षातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते. नियमांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. तर काही जायबंदी झाले आहेत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. या रिक्षांना स्वतंत्र पार्किंग नसल्याने या रिक्षा रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने लावल्या जातात. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सहाय्य्क पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी सांगितले.

पादचाऱ्यांरी, महिलांना नाहक त्रास
काही रिक्षांना तर मराठवाडा विदर्भातील नोंदणी झालेले क्रमांक आहेत. या रिक्षावर पोलिसांनी कारवाई केली तरी ती थोडी मलमपट्टी असते. दंडात्मक कारवाई पोलिस करतात. परंतु पुन्हा पुन्हा त्या रिक्षा त्या चौकात येतात. रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे लावल्या जातात. रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरी चालते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही फोफावत चालले आहे. काही रिक्षा चालक गुन्हेगारही आहेत. इतर जिल्ह्यातून गुन्हे करून आल्यानंतर ते या परिसरात रिक्षा चालवतात. रिक्षा चालकातील वादावादी, दादागिरी अगदी रस्त्यावर चालते. त्यामुळे तेथील व्यवसायिकांना, पादचाऱ्यांना, महिला, तरुणी, कामगार आदींना रिक्षाचालकांच्या दादागिरीचा ही सामना करावा लागतो.

ज्या रिक्षा अवैधपणे रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे लावल्या जातात.त्या रिक्षावर दंडात्मक कारवाई केली जाईल.कारवाईची अंमलबजावणी सुरू आहे. वाहतुकीला अडथळा ठरतील अशा रिक्षावर तसेच रिक्षा चालकांना समज देऊन योग्य ते कार्यवाही करण्यात येते. दंडात्मक कारवाई केली जाते.
- वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक ,चाकण वाहतूक विभाग

07216

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com