चाकणमध्ये रंग लावलेल्या वाटाण्याची विक्री

चाकणमध्ये रंग लावलेल्या वाटाण्याची विक्री

Published on

चाकण, ता. ९ : चाकण (ता. खेड) येथील बाजारात सध्या हिरवा रंग लावलेल्या वाटाण्याची विक्री जोमात सुरू आहे. मात्र फसवणूक करणाऱ्यांवर अन्न, औषध प्रशासनातर्फे कोणतीच कारवाई केली जात नाही. आरोग्य धोक्यात आणणाऱ्या वाटाणा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

बाजारात किरकोळ बाजारात हिरवा वाटाण्याचा बाजारभाव प्रतिकिलोला दोनशे रुपयांवर गेलेला आहे. घाऊक बाजारात हिरवा वाटाणा दीडशे रुपये प्रतिकिलोला विकला जात आहे. राज्यातील विविध बाजारात आर्टिफिशियल फूड कलर रंग लावलेले अनेक कडधान्य दिसतात. बाजारात हिरवा वाटाणा ही रंग लावलेला दिसतो.

हिरवा कलर लावल्याने तो वाटाणा ताजा दिसतो. त्याची खरेदी ग्राहकांकडून होते. हिरव्या वाटाण्याचे बाजारभाव वाढलेले असताना वाळवलेला वाटाणा विकत घेतला जातो. तो पाण्यात भिजवला जातो. त्याला आर्टिफिशियल फूड कलर म्हणजे हिरवा रंग दिला जातो. फूड कलर टाकलेल्या पाण्यात बुडवून तो वाटाणा ताजा वाटाणा आहे, असे भासविले जाते आणि तो सराईतपणे विकला जातो.

फूड कलर यामध्ये हिरवा कलर लावलेला वाटाणा तो आरोग्याला घातक आहे. आर्टिफिशियल फूड कलर लावून वाटाणा बाजारात विकला जातो. त्यामुळे कर्करोगासारखे आजार उद्भवू शकतात. ग्राहकांनी हा वाटाणा खरेदी करू नये. असा वाटाणा विकणाऱ्या वर अन्न, औषधं प्रशासनाने तपासणी करून कारवाई केली पाहिजे.
- डॉ.सचिन कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, चाकण ग्रामीण रुग्णालय


07537

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com