सुरेश गोरे यांना आज
चाकणला अभिवादन

सुरेश गोरे यांना आज चाकणला अभिवादन

Published on

चाकण, ता. 8 : खेडचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता चाकण (ता. खेड) येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका आणि गोरे कुटुंबीयांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित केली आहे.
यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार करण्यात येणार आहेत. यामध्ये उद्योगरत्न पुरस्कार भरत कानपिळे, बाळासाहेब मांजरे, आरोग्यदूत पुरस्कार सुनील शहा, रवी लोहिरे, शिक्षणरत्न पुरस्कार संजय नाईकडे, सेवाभावी संस्था पुरस्कार माऊली सेवा प्रतिष्ठान खेडचे कैलास दुधाळे, क्रीडाभूषण पुरस्कार मॉर्डन हायस्कूल भोसे, वनश्री पुरस्कार सपना राठोड, समाजसेवा पुरस्कार सत्यवान नवले, कलारत्न पुरस्कार निकिता व अवंतिका शंकर बहिरट, विशेष प्रोत्साहनपर माहिती सेवा पुरस्कार दत्तात्रेय साबळे यांना देण्यात येणार आहे. तसेच, सायंकाळी चार ते सहा या वेळेत ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांची कीर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अन्नप्रसादाचे आयोजन केले आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, स्व. माजी आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान मित्र परिवार खेड तालुका आणि गोरे कुटुंबीयांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com