

चाकण, ता. १७ : येथील (ता.खेड) औद्योगिक वसाहतीत तसेच चाकण, महाळुंगे परिसरात गुन्हेगारीचा विळखा वाढत चालला आहे. महाळुंगे येथे दसऱ्याच्या दिवशी गरबा दांडिया कार्यक्रमात एकावर झालेला गोळीबार तसेच गुन्हेगारांनी केलेला हवेत गोळीबार असे प्रकार वाढत आहेत. परिसरात खुनांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.
वाढते खून, गोळीबार, हल्ल्याचे प्रकार या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत, कामगारांत दहशत व भीती निर्माण झालेली आहे. अल्पवयीन मुलांची वाढती गुन्हेगारी वाढते खून यामुळे परिसरात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले की काय? पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे या परिस्थितीकडे दुर्लक्ष होते आहे का असाही नागरिकांचा, व्यावसायिकांचा, उद्योजकांचा सवाल आहे.
औद्योगिक वसाहत तसेच चाकण, महाळुंगे परिसर हा मोठा परिसर अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खंडणी, अपहरण, हप्ते मागणे, धमकी, हाणामारी असे प्रकारे वाढले आहेत. हे प्रकार वाढल्याने नागरिक, कामगार, उद्योजक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण, महाळुंगे परिसरात ठेकेदारीवरून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच खंडणीचे प्रकार वाढलेले आहेत.यामध्ये काही राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचाही छुपा सहभाग आहे. यामुळे गुंडगिरी दहशत वाढते आहे त्याचा परिणाम औद्योगिक वसाहतीतील कंपन्यावरही होत आहे. भंगार व्यवसाय व कामगारांची ठेकेदारी यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कंपनीत ठेके मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच दादागिरीचे प्रमाण वाढले आहे.
इझी मनी मिळविण्यासाठी धडपड
चाकण, महाळुंगे परिसरात अवैध धंदे वाढत आहेत. गांजा, बेकायदा दारू विक्री केली जात आहे. इझी मनी मिळविण्यासाठी जो तो धडपडतो आहे.अल्पवयीन मुले गांजाचे सेवन मोठ्या प्रमाणात करून गुन्हेगारी करत आहेत असेही भयानक वास्तव आहे. जे कामगार, इतर लोक प्लॉट घेऊन घरांची कामे करतात त्यांच्याकडून खंडणी, हप्ता मागण्याच्या टोळ्या कार्यरत आहेत. खंडणी, हप्ता दिला नाही तर त्यांना हाणामारी, दमदाटी होते आहे असे प्रकार घडत आहेत.
बाल गुन्हेगारीत वाढ
चाकण,महाळुंगे परिसरात अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी वाढली आहे. ही गुन्हेगारी धोकादायक आहे. त्यातून खुनाचे प्रकार घडत आहेत. या परिस्थितीवर पोलिसांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, असा आरोप नागरिक, कामगारांचा आहे. गावठी कट्टे, पिस्तूल मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथून आणले जातात. गावठी कट्टे, पिस्तूल अगदी कमी रकमेत मिळतात त्यामुळे ते विकणारी व घेणारी टोळी मोठ्या प्रमाणात चाकण औद्योगिक वसाहतीत चाकण महाळुंगे परिसरात कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.