निवडणुकीत हवा कोणाची?
चाकण, ता. १९ : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात असून, प्रचाराच्या तोफा सोमवारी (ता. १८) थंडावल्या आहेत. सोशल मीडियावर मात्र प्रचार जोरात सुरू आहे. आता फक्त बुथवर, मतदान केंद्रांत मतदान खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची घाई सुरू असल्याची चित्र सर्वत्र दिसते आहे.
तालुक्यात गावची, शहराची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कार्यकर्ते जोरात प्रयत्न करताना दिसत आहेत. कोण कोठे बूथ लावणार, खर्च किती मिळणार यावरच पदाधिकारी, कार्यकर्ते मग्न आहेत. उद्या राज्यात मतदान होणार आहे. शहरात, गावागावात ठिकठिकाणी गल्लीबोळात, गावच्या पारावर, कट्ट्यावर, चहाच्या, पानाच्या टपरीवर सगळीकडेच निवडणुकीत कोणाची हवा आहे, कोण निवडून येणार, कोण पैसे वाटतो, कोण जेवण देतो, कोण काय देतो याची जोरात चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला तरी तालुक्यात कोण निवडून येणार, कुणाची हवा, कोणाचे पारडे जड, कोण पराभूत होणार, अशी चर्चा सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रंगत आहे. अगदी पैजाही लागत आहेत.
राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवारही एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात मतांसाठी जोरात रस्सीखेच करत आहेत. निवडून येणार कोण? या चर्चेने सध्या मोठा जोर पकडला आहे. कोणाचा जोर कोणत्या भागात आहे. कोणाला सहानभूती मिळणार, कोणता नेता पॉवरबाज ठरणार यावर चर्चा झडत आहेत. राज्यात सरकार महाविकास आघाडीचे येणार, की पुन्हा महायुतीलाच संधी मिळणार, तसेच कोणत्या तालुक्यात कोण जिंकणार, कोण आमदार होईल? इकडे, तिकडे कोण निवडून येणार, अशा गप्पा जोरदार रंगत आहेत. कोणत्या उमेदवाराची कोणती बाजू कमकुवत आहे, कोणत्या उमेदवाराने विकासकामे केलीच नाही. कोण नवखा आहे, कोण विकासकामे करणार आहे, कोणाची नुसती आश्वासने आहेत, अशा खास चर्चा कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहचल्या आहेत. जो तो आपली बाजू कशी खरी आहे हे पटवून देण्यात मग्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

