

चाकण, ता. ३ : भानोबाची कोयाळी (ता. खेड) येथील भानोबा देवाच्या यात्रेसाठी सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. ‘भानोबाच्या नावानं चांगभलं, भानोबा महाराज की जय’ या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दोन दिवस देव, दानव युद्ध झाले. हे युद्ध पाहण्यासाठी, भानोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक नागरिकांनी गर्दी केली होती.
कोयाळी येथे यात्रा चार दिवस चालते. पहाटे पाच वाजता देवाला पूजा, अभिषेक, नैवेद्य, आरती झाली. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. काल दुपारी तीन वाजता व आज दुपारी बारा ते तीन च्या सुमारास देव दानवयुद्ध झाले. परंपरेनुसार दानव तरुण हातात काठ्या घेऊन येतात. देवाच्या मुखवट्याला दानवांची नजरेला नजर भिडली की ते जमिनीवर कोसळतात. भानोबा देव व दानव यांच्यात परंपरेनुसार युद्ध होते. देवाचा नामघोष व संजीवनी मंत्राद्वारे जमिनीवर बेशद्धअवस्थेत पडलेल्या दानवांना पुन्हा जिवंत केले जाते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
भानोबा देवाच्या दर्शनासाठी विविध तालुक्यातील पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते, आजी, माजी आमदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेचे नियोजन भानोबा देव ॲड. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच सार्वजनिक ग्रामविकास ट्रस्ट कोयाळीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले होते. सार्वजनिक ग्रामविकास ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी मोफत अन्नप्रसाद व पाण्याचे वाटप करण्यात येत होते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. पुष्पवृष्टीही करण्यात आली. यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यती,तमाशा तसेच मातीवरील कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, भानोबा देव अँड मंदिर ट्रस्ट व सार्वजनिक ग्रामविकास ट्रस्ट या दोन्हींच्याही वतीने यात्रेसाठी आलेल्या विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मानसन्मान करण्यात आला.
गावात दोन गट असल्याने व काही वादविवाद असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे गावात शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत पार पडली.
- शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी -चिंचवड
07743
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.