उत्पादन खर्चही होईना वसूल

उत्पादन खर्चही होईना वसूल
Published on

चाकण, ता. ११ : राज्यातील विविध बाजारात सध्या आठ शेतीपिकांच्या उत्पादित मालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे हे भयानक वास्तव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आहे. शेतमाल हमीभावाने खरेदीची आम्ही गॅरंटी देतो, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अनेकवेळा सांगितले असले, तरी परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील खुल्या बाजारात महत्त्वाच्या ११ शेतीपिकांपैकी आठ पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग, सूर्यफूल, उडीद या पिकांना बाजारात साधा हमीभावही मिळत नाही असे चित्र आहे. राज्यात केवळ तूर, तीळ, भाताला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे.
राज्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा प्रतिकिलोला आठ ते दहा रुपये कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडे ४० ते ४२ रुपये प्रतिकिलोने विकावे लागत आहे. हमीभावाने सरकारची काही केंद्रावर खरेदी सुरू आहे, पण केंद्र कमी प्रमाणात खरेदी करून किचकट प्रक्रिया राबवत आहेत. त्यातच वेळ त्यात असल्याने शेतकरी शासनाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत आहे. बहुतांश शेतकरी खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडे सोयाबीन विकत आहेत. राज्यात प्रत्यक्षात खुल्या, किरकोळ बाजारात बाजरीचे भाव हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त दिसतात. प्रमुख बाजरी उत्पादक राज्यात बाजरीचे भाव कमी आहेत हे चित्र आहे.

सरकार शेतीपिकांच्या उत्पादित मालाला हमीभाव जाहीर करते परंतु प्रत्यक्षात विक्रीतून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते. सरकार चुकीच्या पद्धतीने खर्च गृहीत धरून उत्पादन खर्च काढते. त्यामुळे चुकीचे हमीभाव दिले जातात. हमीभाव पिकांच्या उत्पादन खर्चाएवढाही नाही. हमीभावही उत्पादित मालाला बाजारात मिळत नाही. हमीभाव आणि प्रत्यक्षात विक्रीचे भाव यामध्ये दरवर्षी मोठी तफावत राहते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतो आहे.
-बाजीराव जाधव, सोयाबीन उत्पादक शेतकरी

हल्ली सोयाबीन पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळला आहे. सोयाबीन पिकाखालील क्षेत्रही वाढले आहे. परंतु सोयाबीनला सरकारी हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सोयाबीनचा हमीभाव प्रतिकिलोला ४८ रुपये आहे, परंतु प्रत्यक्षात सोयाबीन खुल्या बाजारात ४०, ४१, ते ४२ रुपये प्रति किलो भावाने विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे ही वास्तविकता आहे. खुल्या बाजारात ४० रुपये प्रतिकिलोने शेतकऱ्यांचे सोयाबीन विकत घेतले जात आहे.
-किशोर नहार, सोयाबीनचे व्यापारी

२०२४-२५साठीचे सरकारने जाहीर केलेले हमीभाव
हमीभावापेक्षा कमी दर मिळणारा शेतमाल
शेतमाल : हमीभाव : खुल्या बाजारातील भाव
(प्रतिक्विंटलचे भाव रुपयांमध्ये)
कापूस मध्यम धागा : ७१२१ : ६९००
कापूस लांब धागा : ७५२१ : ७३००
सोयाबीन : ४८९२ : ४०००
मूग : ८६८२ : ६५००
मका : २२२५ : २१००
ज्वारी हायब्रीड : ३३७१ : २४००
ज्वारी मालदांडी : ३४२१ : २८००
बाजरी : २६२५ : २५००
भुईमूग : ६७८३ : ५८००
सूर्यफूल : ७२८० : ६०००

हमीभावापेक्षा जास्त दर मिळणारा शेतमाल
उडीद : ७४०० : ७५००
तूर : ७५५० : ८०००
पांढरे तीळ : ९२६७ : ११०००
काळे तीळ : ९२६७ : १५०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com