अनैतिक संबंधांतून मेहुण्यानेच केला दाजीचा खून
चाकण, ता. १६ : आसखेड खुर्द (ता. खेड) शिवारात गुरुवारी (ता. १३) रोजी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या तरुणाची ओळख पटली असून, अनैतिक संबंधांतून मेहुण्यानेच दाजीचा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.
अर्जुन गबाजी कावडे (वय ४४, रा. सात बंगला, अंधेरी, मुंबई, मूळ रा. कोळीये, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा व महाळुंगे पोलिसांनी चौकशी करून त्याचा मेहुणा गणेश धनाजी काळोखे (वय ४०, रा. मुंबई), काळोखे याचा मावसभाऊ विकास शांताराम मोदळे (वय ३०, रा. मालवणी, मुंबई)यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन कावडे याचा मृतदेह आसखेड खुर्द गावच्या हद्दीत आढळला होता. त्यानंतर महाळुंगे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या शोधासाठी महाळुंगे पोलिस व गुन्हे शाखा युनिट तीन अशी दोन पथके तपास करत होती. पोलिसांनी कावडे यांच्या गावांमध्ये तपास केला. मुंबई येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात कावडे याचे गणेश काळोखे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा होते. याचा राग मनात धरून गणेशने अर्जुनचा खून केल्याचे समोर आले. आरोपी काळोखे व कावडे हे दोघे रिक्षा चालक होते. यात्रेसह इतर कामानिमित्त ते मुंबईहून रिक्षाने गावी आले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळेस काळोखे व मोदळे या दोघांनी कावडे याचा खून केला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगड मारून त्याचा चेहरा विद्रूप केला होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते, जितेंद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक दत्तात्रेय जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

