चाकणला कांद्याचा बाजारभाव वधारला

चाकणला कांद्याचा बाजारभाव वधारला

Published on

चाकण, ता. १६: चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले घाऊक बाजारात रविवारी (ता. १६) कांद्याची सुमारे आठ हजार क्विंटल आवक झाली. बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रतिकिलोस पाच रुपयांनी वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
बाजारात हिरव्या वाटाण्याची मध्यप्रदेश व राजस्थान राज्यातून आवक झाली. आवक वाढल्याने त्याचे बाजारभाव घसरले आहेत. हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला चोवीस ते सत्तावीस रुपये भाव मिळाला. टोमॅटोचेही बाजारभावही घसरले. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रतिकिलोला पाच रुपयापासून दहा रुपये भाव मिळाला. टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला ३० ते ४५ रुपये भाव मिळाला.

लसणाची आवक पंचवीस क्विंटल झाली. घाऊक बाजारात लसूण एकशेतीस रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. बटाट्याची आवक सोळाशे क्विंटल झाली.बटाट्याला प्रतिकिलोला तेरा ते पंधरा रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे तसेच स्थानिक काढणी केलेल्या नवीन बटाट्याची काही आवक होत आहे.
कोथिंबिरीचे भाव फारच घसरले आहेत.मेथीच्या जुड्यांचे भाव वाढले आहेत.
फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव: हिरवी मिरची-३० ते ४५, हिरवा वाटाणा-२४ ते २७ , भेंडी-२० ते ४०, टोमॅटो-५ ते १०, गवार-५० ते ७०, फ्लॉवर ६ ते १०, कोबी ४ ते ६, दुधी भोपळा १० ते २०, राजमावाल-३० ते ४०, शेवगा-५०ते ६०, ढोबळी मिरची-२० ते ४०, डांगर भोपळा -३० ते ४०, दोडका-३० ते ४०, वांगी -१० ते २०.


मेथीच्या जुडीची दहा रुपयांना विक्री
बाजारात कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजारावर जुड्यांची आवक झाली. मेथीची एक जुडी आठ ते दहा रुपयाला विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी पाच ते दहा रुपयाला विकली गेली.शेपूची एक जुडी पाच ते दहा रुपयाला विकली गेली. पालकच्या चार हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी चार ते सहा रुपयाला विकली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com