

चाकण, ता. ९ : चाकण-शिक्रापूर मार्गावर कडाचीवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका हॉटेलचालकाला तसेच त्याच्या भावाला व एका ग्राहकाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. यात तिघेही जखमी झाले आहेत. हा प्रकार शनिवारी (ता. ८) रात्री आठच्या सुमारास घडला. याप्रकरणी आरोपी व्यंकटेश ऊर्फ हर्शल परशुराम जाधव (रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) याच्यासह त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गावठी गुळाचा चहा या हॉटेलमध्ये आरोपी व्यंकटेश ऊर्फ हर्शल परशुराम जाधव व त्याच्या इतर चार साथीदारांनी येऊन हॉटेलचालक सिद्धेश विलास मुंगसे (वय २७, रा. रासेफाटा ता. खेड), त्याचा भाऊ संकेत विलास मुंगसे व ग्राहक कुणाल भोवते यांना बेदम मारहाण करत गल्ल्यातील दोन हजार रुपये काढून घेतले.
गोळीबाराची अफवा
चाकण-शिक्रापूर मार्गावर कडाचीवाडी फाट्याजवळ एका हॉटेलवर आरोपींनी धुडगूस घातला. तोडफोड केली. शिवीगाळ करून दहशत केली यामुळे शेजारील व्यावसायिक तसेच नागरिक भयभीत झाले होते. आरोपींनी हॉटेलमध्ये गोळीबारही केला, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आरोपींनी गोळीबार केला नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.