वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची
तडकाफडकी बदली

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

Published on

चाकण, ता. ९ : येथील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. चाकण येथील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी संतोष कसबे यांची येथे नियुक्ती वर्षभरापूर्वी केली होती. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी तळेगाव चौक, आंबेठाण चौक, माणिक चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावणे, चौकात पथदिव्यांची सोय करणे. फोडलेले दुभाजक व्यवस्थित करून घेणे, तळेगाव, आंबेठाण, माणिक चौकात, एमआयडीसी फाटा, आळंदी फाटा येथे होणारी कोंडी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांची अचानक बदली केल्याने तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com