प्लॉटधारकांचा रस्ता अडवून खंडणीची मागणी

प्लॉटधारकांचा रस्ता अडवून खंडणीची मागणी
Published on

चाकण, ता. १४ : कुरुळी (ता. खेड) येथे पुणे- नाशिक महामार्गावरील इंद्रायणी पार्क येथील सुमारे ३४० प्लॉटधारकांचा येण्या -जाण्याचा मुख्य रस्ता अडवला व तो मोकळा करून देण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी, तसेच प्लॉटधारकांनी इमारतीची बांधकामे मलाच द्यावीत, अशी मागणी केल्याप्रकरणी खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर कांबळे व त्यांचा भाऊ अनिल कांबळे यांच्यावर खंडणीचा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी माहिती दिली की, याबाबतची फिर्याद धर्मसिंग पाटील (वय ३९, रा. कुरुळी) यांनी दिली आहे. त्यांच्यासह ३४० प्लॉटधारकांनी इंद्रायणी पार्क येथे प्लॉट खरेदी केले आहेत. काही प्लॉटधारकांनी येथे घराचे बांधकामही सुरु केले आहे. या पार्कला पुणे-नाशिक महामार्गापासून प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. त्याचा वहिवाटीसाठी करारनामा दुय्यम निबंधकांकडे रीतसर केलेला आहे. तो इंद्रायणी पार्क विकासक यांना अमर कांबळे व त्यांचा भाऊ अनिल कांबळे यांच्या सहमतीने दिला होता. त्यानंतर तसाच करारनामा विकासक व प्लॉटधारक यांच्यात झाला. त्यामुळे पार्कसाठी रस्ता दिला आहे. हा रस्ता सुरळीत सुरु असताना अमर कांबळे, अनिल कांबळे यांनी जे प्लॉटधारक बांधकाम करत आहेत, त्यांनी संबंधित कामे आम्हालाच द्यायची. इतर कुणाला द्यायची नाहीत, असे सांगितले. मात्र, काही प्लॉटधारकांनी कामे अमर कांबळे यांना न देता त्यांच्या मर्जीप्रमाणे इतरांना दिली. याचा राग मनात धरून अमर कांबळे व अनिल कांबळे यांनी इंद्रायणी पार्कच्या प्रवेशद्वारावर एक मोठ्या कंटेनरची केबिन येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठेवली. त्यामुळे रस्ता वहिवाटी करता पूर्णतः बंद झाला. तसेच त्यांनी प्लॉटधारकांना, ‘तुम्ही बांधकाम कसे करता? प्लॉटवर कसे येता- जाता हे आम्ही बघतोच,’ अशी धमकी देत आहे. सर्व प्लॉटधारकांनी वेळोवेळी त्यांना प्रवेशद्वारावरील कंटेनरची केबिन काढण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी, ‘जेव्हा आम्हाला कामे द्याल, तेव्हाच कंटेनरची केबिन काढू,’ असे सांगितले व धमकावून खंडणीची मागणी केली. याप्रकरणी त्यांच्यावर महाळुंगे पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

इंद्रायणी पार्कच्या प्रवेशद्वारावर आरोपींनी कंटेनरची केबिन आडवी लावली होती. त्यामुळे येण्या- जाण्याचा मुख्य रस्ता बंद झाला होता. हा कंटेनर पोलिस जप्त करणार आहेत.
- नितीन गीते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महाळुंगे पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com