

चाकण, ता.३०: चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात सोलापूर जिल्ह्यातून सुमारे पन्नास टनांहून अधिक कलिंगडे विक्रीसाठी आली आहेत. वाढत्या उन्हामुळे त्यास वाढली आहे. मात्र बाजारभाव घसरत झाली. बाजारात रविवारी (ता.३०) कांद्याची आवक सुमारे चार हजार क्विंटल झाली. त्यास कांद्याला प्रतिकिलोला किमान १० रुपये तर कमाल १६ रुपये बाजारभाव मिळाला.
बाजारात हिरव्या वाटाण्याची मध्यप्रदेश व राजस्थान राज्यातून आवक झाली. हिरव्या वाटण्याला मागणी वाढते आहे.परंतु आवक घटलेली आहे. हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रति किलोला पन्नास ते पंचावन्न रुपये बाजारभाव मिळाला. बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला ४० ते ५५ रुपये बााजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
लसणाची आवक तीस क्विंटल झाली. घाऊक बाजारात लसूण साठ ते शंभर रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे..
फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव पुढीलप्रमाणे :
हिरवी मिरची - ४० ते ५५ , हिरवा वाटाणा- ५० ते ५५, भेंडी - २० ते ४०, टोमॅटो -५ ते १०, गवार-५० ते ८०. फ्लॉवर ४ ते ६, कोबी ३ ते ५, दुधी भोपळा १० ते २०, राजमा वाल -३० ते ४०, तुरमुड्या वाल -४० ते ५०, चवळी-२० ते ३०, शेवगा- २० ते ३०, ढोबळी मिरची-२० ते ४०, आद्रक- २० ते ३०, तोंडले -३०, काकडी -८ ते १५.
पालकच्या चार हजार जुड्यांची आवक
बाजारात कोथिंबीर, मेथीच्या सुमारे एक लाख जुड्यांची आवक झाली. मेथीची एक जुडी दहा ते पंधरा रुपयाला विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी सहा ते दहा रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी आठ ते दहा रुपयाला विकली गेली. पालकच्या चार हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी पाच ते सहा रुपयाला विकली गेली.
08321
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.