अवकाळीचा गिरवी कांद्यास तडाखा

अवकाळीचा गिरवी कांद्यास तडाखा
Published on

चाकण, ता. ४ : येथील चाकण परिसरात गुरुवारी (ता.३) सायंकाळी पडलेल्या पावसाने काढणी केलेला तसेच बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. गिरवी जातीचा कांदा काढणी केल्यानंतर त्याला ऊन लागते. त्यामुळे तो सुकतो. परंतु काढणी केल्यानंतर तो भिजल्याने तो पाणी धरणार आहे.

राज्यात गरवा जातीच्या कांद्याचे पीक खेड तालुक्यात विशेषतः: चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा गिरवी जातीचा कांदा निर्यातीसाठी योग्य असतो. त्यामुळे त्याला मागणी असते. गिरवी कांद्यास उग्रवास तसेच फिक्कट लालसर पापुद्राचा असतो. त्यामुळे हा टिकाऊ असतो. टिकाऊ असल्याने निर्यातीसाठी विशेष मागणी असते. दुबई, श्रीलंका, बांगलादेश, सिंगापूर, आखाती प्रदेशात गरवा जातीच्या कांद्याला विशेष मागणी असते. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच मुंबईतील निर्यातदार कंपन्या, व्यापारी गिरवी जातीचा कांदा खरेदी करण्यासाठी चाकण बाजारात तळ ठोकून बसतात. सध्या राज्यात या काढणी जोरात सुरू आहे.

शेतात काढणी केलेला रब्बी हंगामातील गिरवी जातीच्या कांद्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे कांदा भिजल्यानंतर तो टिकाऊ राहत नाही तो सडतो. काढलेल्या कांद्याला पाऊस लागणे हे धोकादायक आहे. माझा दोन एकर क्षेत्रावरील कांदा भिजला तसेच इतर शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात कांदा भिजला.
- विशाल पऱ्हाड, कांदा उत्पादक शेतकरी

08332

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com