चाकणच्या बाजारात तोतापुरी कैऱ्यांची आवक

चाकणच्या बाजारात तोतापुरी कैऱ्यांची आवक

Published on

चाकण , ता. १३: येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात रविवारी (ता. १३) कर्नाटक राज्यातील तोतापुरी कैऱ्यांची सुमारे दहा टन आवक झाली. या कैऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसात मागणी राहीली. त्यामुळे या कैऱ्यांना भावही चांगले राहीले. या कैऱ्यांना प्रतिकिलोला चाळीस रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याची आवक सुमारे पाच हजार क्विंटल झाली.कांद्याला प्रतिकिलोला किमान आठ रुपये तर कमाल १४ रुपये बाजारभाव मिळाला
बाजारात हिरव्या वाटाण्याची मध्यप्रदेश व राजस्थान राज्यातून अल्प प्रमाणात आवक झाली. त्यास हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला साठ ते सत्तर रुपये भाव मिळाला. बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ ते ३५ रुपये भाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
लसूणाची आवक पंचवीस क्विंटल झाली. घाऊक बाजारात लसूण साठ ते शंभर रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. लसणाचे भाव घसरले आहेत .बटाट्याची आवक बाराशे पन्नास क्विंटल झाली. बटाट्याला प्रतिकिलोला बारा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला.

फळभाज्यांचे एका किलोचे भाव पुढील प्रमाणे : हिरवी मिरची- ३० ते ३५, हिरवा वाटाणा-६० ते ७०, भेंडी-३० ते ४५, टोमॅटो -८ ते १२, गवार -५० ते ७०, फ्लॉवर १० ते १५, कोबी ४ ते ६, दुधी भोपळा १० ते २०, राजमा वाल -३० ते ४०, चवळी - १५ ते २५, शेवगा- २० ते ३५, ढोबळी मिरची - ३० ते ४५, आद्रक- २० ते ४०, तोंडले -३०, डांगर भोपळा -३० ते ४०, दोडका -३५ते ४५, काकडी -१५ ते २५ , कारली ३० ते ४५.

बाजारात कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजारावर जुड्यांची आवक झाली. मेथीची एक जुडी बारा ते सतरा रुपयाला विकली गेली .कोथिंबीरीची एक जुडी चार ते आठ रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी सहा ते दहा रुपयाला विकली गेली. पालकच्या चार हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी चार ते आठ रुपयाला विकली गेली.


08368

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com