खेडच्या विकासाला गती देणारा दूरदृष्टीचा नेता
खेड तालुक्याच्या विकासाला गती देणारा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा माणूस म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (अण्णा). तालुक्यातील जनतेच्या समस्यांसाठी अण्णा अहोरात्र प्रयत्न करतात त्या समस्यांचे निराकरण करतात आणि गोरगरिबांना न्याय देतात. खेड तालुक्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी,महिला यांना न्याय देणारा खरा माणूस म्हणजे अण्णा. तालुक्याचे विकासाचे शिल्पकार अण्णा..... अण्णांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला एक मागोवा...
- सागरशेठ बनकर, चाकण
खेड तालुक्याचा इतिहास पाहिला आणि वर्तमान पाहिला तर खेड तालुक्याचा विकास करताना कोण आपला, कोण दूरचा हे न पाहता माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावाचा, वाड्या, वस्त्यांचा विकास कसा होईल याकडे नेहमी लक्ष दिले आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा एक सर्वांना प्रेरणादायी असा प्रवास आहे. बांधकाम व्यावसायिक गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार असा एक संघर्ष करणारा त्यांचा एक मोठा प्रवास आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील हे खेड तालुक्यातील शेतकरी, गोरगरीब, मजूर, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. तालुक्याच्या राजकारणापासून त्यांनी सुरुवात केल्यानंतर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कसे सोडवले जातील तालुक्यातील गावांचा विकास कसा होईल. यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला आहे आणि करत आहेत. तालुक्याच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे मोठया प्रमाणात आयोजन केले. शेकडो गोर,गरीब मुलामुलींचे विवाह झाले. मोहितेपाटील यांनी आमदारपदाची जबाबदारी सांभाळत असताना वाडी, वस्ती तेथे रस्ता, सार्वजनिक सभागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळा, वीजपुरवठा व इतर सुविधा निर्माण केल्या. तालुक्यातील बागायती क्षेत्र वाढावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कार्यकर्त्याचा सर्वसामान्य व्यक्तीचा त्यांना फोन असो रात्री अपरात्री ते फोन उचलतात आणि त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देतात त्या व्यक्तीचे काम ते करतात. हा त्यांचा खाक्या सर्वांना आवडतो आहे. वेळप्रसंगी शासकीय अधिकाऱ्यांना ते चांगलेच सुनावतात.त्यांच्याशी पंगा ही घेतात आणि सर्वसामान्य व्यक्तीचे,कार्यकर्त्याचे काम कसे होईल याकरिता अधिक लक्ष देतात.
सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढणारा नेता
सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रश्नासाठी,न्यायासाठी अहोरात्र लढणारा नेता असेही त्यांचे वर्णन केले जाते. तालुक्यातील भूमिपुत्रांना खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळावा यासाठी वेळप्रसंगी ते उद्योजकांनाही सुनावतात. अगदी मंत्र्यांनाही सुनावतात. खेड तालुक्यातील तरुण हा उद्योजक झाला पाहिजे त्याला विविध कंपन्यांत रोजगार मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्या संघर्षामुळे त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कामामुळे सर्वसामान्य जनता, कामगार, शेतकरी, महिला, अगदी विद्यार्थीही नेहमी त्यांचे भरभरून कौतुक करतात.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
तालुक्यातील जनतेने त्यांना तीन वेळा तालुक्याचा आमदार होण्याची संधी दिली . ही मोठी संधी आहे.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संचालक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा आर्थिक विकास कसा होईल याकडे नेहमी ते लक्ष देतात. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना योग्य सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी ते प्रयत्न करतात. कांदा निर्यात बंदी होती त्यावेळेस त्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून अगदी मुख्यमंत्री, केंद्र सरकार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.
नगरपरिषदांचा विकासाकडे लक्ष
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात उत्कृष्ट बाजार समिती
झाली पाहिजे. राज्यात बाजार समिती उत्कृष्ट झाली पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. माजी आमदार मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन सर्वांनाही महत्त्वाचे वाटते. खेड तालुक्यातील नगरपरिषदांचा कारभार
सुधारावा. खेड तालुक्यातील नगरपरिषदांचा विकास व्हावा यासाठी नेहमी त्यांचा प्रयत्न असतो.
औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यावर पुढाकार
औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी त्यांचा पुढाकार असतो.मा.आमदार दिलीप मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई मोहिते पाटील यांनी तालुक्यातील जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. नेहमी त्यांच्या बोलण्यातून तालुक्यातील जनतेविषयी तळमळ दिसते. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना तालुक्यातील जनतेच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.