चाकणच्या वरिष्ठ पोलिस 
निरीक्षकांची बदली

चाकणच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली

Published on

चाकण, ता. २५ : चाकण (ता. खेड) येथील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची अचानक बदली करण्यात आली. या बदलीने वेगवेगळ्या चर्चांना सुरू आहेत. एका कार्यक्षम व गुन्हेगारीवर वचक आणणाऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्याची त्यांचा दोन वर्षाचा काळ पूर्ण न होता एका वर्षातच तडकाफडकी बदली का झाली? असे संभ्रमित प्रश्न नागरिकांना पडले आहेत. वरिष्ठ निरीक्षक म्हणून वाघ यांनी नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात काम केले आहे. त्यांची कार्यपद्धती गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी दबंग पद्धतीची होती. त्यांनी त्यांच्या काळात अनेक गुन्हेगारांची तडीपारी केली, मकोका लावले. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी काही गुन्हेगारांची स्थानबद्धता केली. त्यामुळे चाकण परिसरातील औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारीला आळा बसला. राज्यातील जे गुन्हेगार चाकणमध्ये वास्तव्यास होते त्यांच्या गुन्हेगारीचा कणा मोडला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघ यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार माझी बदली झालेली आहे. वाघ यांच्या बदलीनंतर विदर्भातून आलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी चाकण पोलिस ठाण्याचा पदभार सांभाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com