निविदा प्रसिद्ध, पण काम कधी?
चाकण, ता. ६ : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) तळेगाव-चाकण आणि चाकण-शिक्रापूर या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी सुमारे ३१२३.९२ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. तळेगाव ते चाकण हा रस्ता चार पदरी, तर चाकण ते शिक्रापूर हा रस्ता सहा पदरी करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर हा परिसर औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून, येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग वसले आहेत. त्यामुळे दररोज अवजड वाहनांची मोठी वाहतूक होते. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नागरिक आणि कामगार वर्ग अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना करत आहेत.
रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी- चिंचवड, चाकण, तळेगाव व शिक्रापूर या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. औद्योगिक वसाहती, राहणी क्षेत्र आणि दळणवळण व्यवस्था याला सकारात्मक चालना मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांचे लक्ष या कामाकडे लागले आहे.
मात्र, चाकण- शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून, वारंवार अपघात घडत आहेत. वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. या मार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेकवेळा निविदा जाहीर झाल्या पण प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पुन्हा एकदा निविदा प्रसिद्ध झाली आहे, मात्र यापूर्वीही अशा अनेक घोषणा फसव्या ठरल्या. त्यामुळे चाकणकर जनतेला आता केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावरच विश्वास बसेल. जनतेचा संयम संपत चालला आहे.
- प्रशांत टोपे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.