चाकणला १०० टन रताळ्याची आवक
चाकण, ता.५ : चाकण (ता. खेड) महात्मा फुले बाजारात शनिवारी (ता.५) कर्नाटक राज्यातून सुमारे शंभर टन रताळ्याची आवक झाली. एकादशीनिमित्त रताळ्याला मोठी मागणी आहे. घाऊक बाजारात रताळ्यास प्रतिकिलोला २५ ते ३० तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळाला.
चाकणला एकादशीच्या पार्श्वभूमीवर रताळ्याची आठवडाभर सुमारे तीनशे टनांपेक्षा अधिक आवक झाली आहे. रताळ्याला मुंबई, पिंपरी-चिंचवड, भोसरी, कोकण भाग, खोपोली, पनवेल, अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राज्यात यावर्षी रताळ्याचे उत्पादन कमी असल्याने परराज्यातून मोठ्या प्रमाणात रताळ्याची आवक चाकण बाजारात होत आहे. कर्नाटक राज्यातील बेळगावी रताळ्याला मोठी मागणी असल्याचे विक्रेते रवींद्र बोराटे, महेंद्र गोरे, आबा गोरे, भानुदास बुट्टे, संजय वहिले, भानुदास टेंगले यांनी सांगितले.
चाकणचा बाजार एकादशी निमित्ताने रताळ्याची मोठी आर्थिक उलाढाल होते. रताळ्याचे बाजारभाव यावर्षी घसरले आहेत. प्रतिकिलोस केवळ २५ ते ३० रुपयेच घाऊक बाजारात बाजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
08749
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.