चाकणला वीस टन रताळ्याची विक्री

चाकणला वीस टन रताळ्याची विक्री

Published on

चाकण, ता. ६ : चाकण (ता. खेड) येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. ६) सुमारे वीस टन रताळ्याची विक्री झाली. रताळ्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला ३५ ते ४० रुपये बाजारभाव मिळाला. एकादशी असल्याने रताळ्याच्या बाजारभाव प्रतिकिलोस दहा रुपयांनी वाढ झाली.

बाजारात कांद्याची फक्त पाचशे क्विंटल आवक झाली. त्यास कांद्याला प्रतिकिलोला घाऊक बाजारात कमाल १८ रुपये बाजारभाव मिळाला. भुईमुगाच्या शेंगाला प्रतिकिलोला भाव किमान चाळीस ते कमाल पन्नास रुपये मिळाला. ओल्या भुईमुगाच्या शेंगांनाही मोठी मागणी राहिली. राज्यातील इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रतिकिलोला अगदी दहा ते अठरा रुपये बाजारभाव मिळाला.

मध्यप्रदेश राज्यातील इंदोर, उत्तर प्रदेशातील आग्रा येथून तसेच गुजरात राज्यातून बटाट्याची आवक झाली. बटाट्याची सुमारे १२५० क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतवारीनुसार तसेच दर्जा नुसार किमान १५ ते २२ रुपये बाजारभाव मिळाला. इंदोर बटाट्याला प्रतिकिलोला २३ रुपये बाजारभाव मिळाला. इंदोर बटाट्याला मोठी मागणी राहिली. कांद्याचे भाव गडगडत असल्यामुळे शेतकरी, व्यापारी चिंतेत आहेत.
हिरव्या मिरचीची दिल्लीतून तसेच राज्यातील बुलडाणा व इतर भागातून सुमारे ५० टन आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिकिलोला किमान ५० ते कमाल ६० रुपये बाजारभाव मिळाला.
फळभाज्यांचे भाव पुढील प्रमाणे (प्रतिकिलोचे भाव) : टोमॅटो : १० ते १८, कारली : ४० ते ६०, दोडका : ४०ते ५०, भेंडी : ४० ते ६०, गवार : ६० ते ९०, कोबी : १० ते १५, फ्लॉवर : २० ते ३०, वांगी : ५० ते ६०, काकडी : १५ ते २५, वालवर : ७०ते ९०, हिरवी मिरची : ५० ते ६०, दुधी भोपळा : २० ते ३०, शेवगा : ६० ते ८०, ढोबळी मिरची : ४० ते ६०, रताळी : ३५ ते ४०.

कोथिंबीरीच्या ५० हजार जुड्यांची आवक
घाऊक बाजारात मेथी, कोथींबीरीच्या सुमारे पन्नास हजार जुड्यांची आवक झाली. मेथीच्या एका जुडीला ७ ते १२रुपये भाव मिळाला तर कोथिंबीरीच्या एका जुडीला ८ ते १४ रुपये भाव मिळाला. शेपूच्या साडेतीन हजार जुड्यांची आवक झाली. शेपूच्या एका जुडीला दहा ते तेरा रुपये भाव मिळाला तर पालकच्या सुमारे तीन हजार हजार जुड्यांची आवक झाली.

08758

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com