शेलगावात शेतकऱ्यांना शेतीचे तांत्रिक मार्गदर्शन

शेलगावात शेतकऱ्यांना शेतीचे तांत्रिक मार्गदर्शन

Published on

चाकण, ता.६: डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी येथील चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या कृषिदुतांचे खेड तालुक्यातील शेलगाव या गावात आगमन झाले. त्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत कृषिदुतांनी शेलगाव व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपिकासाठी तांत्रिक मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू केला आहे.
शेलगाव येथे कृषिदूत धैर्यशील माने, अभय हाके, सुमीत गोरे, ओम नलवडे, ऋषिकेश माळुंजकर, सचिन इचके, निशांत रंगवार सहभागी झाले आहेत. पुढील सात आठवडे या गावामध्ये ते राहणार आहेत. या कृषिदूतांचे स्वागत शेलगावच्या सरपंच वैशाली आवटे, उपसरपंच शुभांगी आवटे , तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांनी केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, उपप्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, कृषी व्यवसाय तज्ञ प्रा.आर.आर.गिरंगे , महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या प्रतिनिधी म्हणून डॉ. टी. बी. देवकाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com