गडकरींकडून हायड्रोजन निर्मिती कार्यशाळेचे कौतुक

गडकरींकडून हायड्रोजन निर्मिती कार्यशाळेचे कौतुक

Published on

चाकण, ता.१५ : वेद जीवनम ग्लोबल रिसर्च फाउंडेशन व प्लास्ट गुरु प्रा. लि. यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गोडसे यांनी सांगितले.
हायड्रोजन मिशन २०२३ या उपक्रमांतर्गत वर्षाला ५ एमटी हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संदर्भात जागरूकता मोहीम हाती घेण्यात आल्याचे या कार्यशाळेत एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, डीआरडीओचे निवृत्त संचालक अशोक नगरकर, एआरएआयचे वरिष्ठ संचालक डॉ. एस. एस. ठिपसे, बेस्टयुको सोल्युशनचे डॉ. आशिष पोलकडे, साकार एज्युकेशनचे आशिष केळकर, हॅब बायोमासचे कृणाल जगताप, राहुरी विद्यापीठाचे डॉ. तुलसीदास बसतेवाड, लेखक अशोक टाव्हरे, एमआयटीचे डॉ. रत्नदीप जोशी, ओएनजीसीचे पूर्व संचालक तथा सॅनियॉनिक्स प्रा.लि.चे डॉ. संजीव कट्टी, इटलीहून ऑनलाइन सहभागी झालेले मॅटियो कोर्टेसी, पॅरिसिको ग्रुप, कुलकोर्प टेक्नॉलॉजिसचे गौरांग कुलकर्णी व ऑटो क्लस्टर पुणेचे शंतनू मुदखेडकर आदींनी हायड्रोजन विषयावर प्रबोधन करणारे प्रात्यक्षिक करून दाखवले.
डॉ. विनय चंद्रात्रे व सतीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रमेश गोडसे यांनी आभार मानले.

08790

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com