चाकणला बेकायदा दारू विक्रीवर कारवाई
चाकणला बेकायदा दारू विक्रीवर कारवाई
चाकण, ता.१३ : चाकण पोलिस ठाण्याचे अधिकारी व त्यांच्या पथकाने चाकण व परिसरातील गावात हॉटेल व दारू भट्टीवर, दारू विक्रेत्यांवर छापे टाकून माल जप्त केला व काही माल उद्ध्वस्त केला. सहा ठिकाणी छापे घालण्यात आले, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळुस (ता. खेड) येथील गावकरी हॉटेलमध्ये बेकायदा दारू विक्री करण्यात येत होती. त्या ठिकाणी छापा घालून देशी,विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. सुमारे ५७९५ रुपयाची दारू जप्त करण्यात आली. आरोपी प्रणय टेंभुणे (वय- २०, रा. काळुस) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. भोसे येथे चाकण- शिक्रापूर रस्त्यावरील हॉटेल देवांश मध्ये आठशे रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी बालाजी यादव (वय २४) त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. मेदनकरवाडी येथील मार्तंडनगरमध्ये प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये असलेली वीस लिटर दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. बहूळ येथे बैलगाडा घाटाच्या बाजूला असलेल्या पत्रा शेडमध्ये ३५लिटर हातभट्टीची गावठी दारू जप्त करण्यात आली. शेलपिंपळगाव ता. खेड गावच्या हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये १४०० रुपये किमतीची हातभट्टीची गावठी दारू जप्त करण्यात आली. मेदनकरवाडी फाटा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये चक्रेश्वर रोडवर सुमारे पंधराशे नव्वद रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या . या प्रकरणी आरोपी महादेव जाधव (वय ४०) याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या सहा छाप्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.