काळूसला पुनर्वसन बाधितांचे उपोषण

काळूसला पुनर्वसन बाधितांचे उपोषण

Published on

चाकण, ता. १७ : काळूस (ता. खेड) येथील पुनर्वसन बाधित सर्व शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. १५) श्रीराम मंदिर सभा मंडपात सत्याग्रह बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पुनर्वसन प्रश्नावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजीमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपोषण सुरू आहे. जोपर्यंत निर्णय मिळत नाही. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही ही ठाम भूमिका सर्वांनी घेतलेली आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुभाष पवळे, विश्वनाथ पोटवडे, गणेश खैरे व इतर शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान, प्रशासन यंत्रणा धनदांडग्यांच्या मतावर चालणाऱ्या निष्क्रिय शासकीय यंत्रणेला कदाचित सर्वसामान्य शेतकऱ्यांचे दुःख कळणार नाही. लोकप्रतिनिधींनाही याचे काही देणे घेणे नाही. शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आहेत शेतीमालाला योग्य भाव नाही, कमी जास्त पावसामुळे शेती तोट्यात गेलेली आहे. दुधाला योग्य भाव नाही हे वारंवार सांगून झालेले आहे. हे सर्व प्रश्न शासनाकडून सुटेल की नाही ही अपेक्षा आता मावळलेली आहे असे उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या उपोषणाला, आंदोलनाला गावचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे.
काळूस येथील शेत जमिनीवर भामा-आसखेड, चासकमान धरणाचे लाभक्षेत्राचे शिक्के गेल्या ४५ वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर आहेत परंतु दोन्ही कालवे रद्द झालेले आहेत. तरीही शिक्के काढले गेले नाहीत. शिक्के काढले पाहिजेत. लाभ क्षेत्रात जमिनी यापूर्वी येत असल्यामुळे धरणग्रस्त प्रकल्प बाधित म्हणून शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप केले आहे. काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने खरेदी दस्त केलेले आहेत ते सगळे दस्त रद्द करून वाटप रद्द करून शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात.

सीबीआय चौकशी झाली पाहिजे
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हाताशी धरून शासकीय नियमावली डावलून काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत. कुलमुखत्यार पत्र केलेले आहेत. या सर्वांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. धरण लाभ क्षेत्रात येत नसलेली गावे पुनर्वसनातून वगळलीच पाहिजे, अशा मागग्या उपोषणकर्ते, आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

09078

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com