चाकणला विसर्जनासाठी १४ ठिकाणी कृत्रिम हौद
चाकण, ता. ३ : येथील नगरपरिषदेच्या वतीने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्ती विसर्जनाकरता विशेष सुविधा, तसेच व्यवस्थांची आखणी केलेली आहे. यामध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करता यावे, यासाठी शहरात विविध १४ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती चाकण नगरपरिषेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील शहरातील सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी, तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये व गणेशमूर्ती विसर्जनाचा पारंपरिक आनंद टिकून ठेवत गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने वाकी खुर्द येथे भामा नदीकाठी, तसेच जिल्हा परिषदेच्या राक्षेवाडी येथील मराठी शाळेजवळ विसर्जन कुंड उभारला आहे. या कुंडात गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रात्रीच्यावेळी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच, संपूर्ण परिसर हा नगरपरिषद नियंत्रण कक्षात ठेवला आहे. नगरपरिषदेद्वारे गणेश भक्तांना या ठिकाणी महत्त्वाची माहिती, दिशा किंवा आपत्कालीन सूचना त्वरित देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली कार्यान्वित केली आहे. अग्निशमन दलही त्या ठिकाणी सज्ज आहे.
या ठिकाणी होणार विसर्जन
गणेशमूर्ती संकलन सावतामाळी मंदिर दावडमळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झित्राईमळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणूबाई मळा, स्वप्ननगरी गणेश मंदिर, एकता नगर मित्र मंडळ एकतानगर, श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगरवाडी, संत सावतामाळी चौक चाकण, संत सावतामाळी मित्र मंडळ माळआळी, यंग जॉली क्लब श्री शनी मंदिर, जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा नंबर एक, बोल्हाई माता मंदिर भुजबळ आळी, श्री गणेश मंदिर श्रीरामनगर, श्री गणेश मंदिर मुटकेवाडी या केंद्रावर नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित राहून गणेश भक्तांना मदत करतील.
नागरिकांनी घरगुती गणेशमूर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित करून व निर्माल्य पाण्यामध्ये न टाकता निर्माल्य कुंडामध्ये टाकावे. पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा. नागरिकांनी, गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद
09218
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.