पुणे
भामा नदीत बुडालेल्याचा अद्यापही शोध नाहीच
चाकण, ता. ८ : वाकी खुर्द (ता. खेड) येथील भामा नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेला अभिषेक संजय भाकरे (वय २१) या तरुणाचा सोमवारी (ता. ८) तिसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही.
अभिषेक हा शनिवारी (ता. ६) पाण्यात बुडणाऱ्या दुसऱ्याला वाचविण्यासाठी गेला असताना तो पाण्यात बुडाला होता. त्याचा शोध गेल्या तीन दिवसांपासून शोध पथक घेत आहे. सोमवारी सकाळी नऊनंतर पथकाने शोधकार्य सुरू केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत अभिषेकचा शोध पथकाला लागला नसल्याने सायंकाळी शोधकार्य करण्यात आले, अशी माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.