पुणे
चाकणच्या त्रिशा विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत
चाकण, ता. ११ : चाकणच्या कन्या विद्यालयातील त्रिशा बोंबले हिची पुणे विभागस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भवानी पेठ, पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत त्रिशाने प्रथम क्रमांक पटकावला होता. आता तिची विभागस्तरासाठी निवड झाली आहे. त्रिशाला विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका शुद्धमती पवार यांनी मार्गदर्शन केले आहे. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिला पिंगळे, क्रांती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शहा, उपाध्यक्ष साधना शहा, सचिव साहेबराव देशमुख, सहसचिव दिलीप इंगवले व इतर पदाधिकाऱ्यांनी त्रिशाचे अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.