चाकण परिसरात मुरूम माफियांची चांदी

चाकण परिसरात मुरूम माफियांची चांदी

Published on

चाकण, ता.१३ : चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील रस्त्यावरून बेकायदा मुरमाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक मोठ्या डंपरमधून कंपन्यांमध्ये भराव टाकण्यासाठी तसेच इतर निवासी, औद्योगिक बांधकामांमध्ये भराव टाकण्यासाठी केली जाते. मुरमाचे भावही वाढले आहेत. अगदी दोन ते तीन हजार रुपयाला एक डंपर विकत घेतला जातो. त्यामुळे मुरूम माफियांची चांदी आहे. मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून उत्खनन केले जाते.

महसूल विभाग ही दुर्लक्ष करतो काही आर्थिक सेटलमेंट मुळे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते. अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी परवानगी घेतली आहे, असे स्थानिक अधिकारी सांगतात. मग ‘तेरी भी चूप, मेरीभी चूप’ म्हणत मोठ्या प्रमाणात अहोरात्र डोंगर फोडून गौण खनिजाची वाहतूक केली जाते. त्यातून लाखो रुपये काहीजण कमवतात हे खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील भयानक चित्र आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीत सुमारे पाच हजारावर डंपर गाड्यातून बेकायदा मुरमाची वाहतूक केली जाते. मोठ्या प्रमाणात डोंगर फोड केली जात आहे. त्यातून अहोरात्र मुरूम उचलला जात आहे. तसेच मुरमाची व दगडाची बेकायदा वाहतूक केली जाते. गौण खनिजाची बेकायदा मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाचे महसुली उत्पन्न बुडते आहे. नावाला रॉयल्टी घ्यायची नावाला थोडा कर भरायचा आणि राजेरोसपणे डोंगर फोड करायची हे धंदे काही माफिया करतात. त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. स्थानिक तलाठी, मंडलाधिकारी तालुक्याच्या पातळीवरील वरिष्ठ अधिकारी याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत. मुरूम, माती, दगड याचे उत्खनन करून त्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या केली जाते.

रस्त्यावर पडलेल्या मुरमामुळे अपघाताचा धोका
औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात डंपरद्वारे वाहतूक केली जाते. या डंपरमधून मोठ्या प्रमाणात मुरूम, दगड रस्त्यावर पडतात पण याकडे डंपर चालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे रस्त्यावर मुरूम, दगड पडलेले दिसतात त्यामुळे अपघात होतात. याकडे कोणाचेच लक्ष नाही याकडे प्रशासन का लक्ष देत नाही.


B09494

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com