डांबरीकरणावर मुरूमखोरीची कुरघोडी

डांबरीकरणावर मुरूमखोरीची कुरघोडी

Published on

चाकण, ता.२९ : येथील माणिक चौकाजवळील चाकण-शिक्रापूर मार्गावर टाकलेले डांबरीकरण काही व्यावसायिकांच्या बेकायदेशीर मुरूमखोरीखाली अक्षरशः चिरडले जात आहे. स्वतःचे ‘शॉर्टकट’ बनवताना त्यांनी नव्या रस्त्याचा अक्षरशः बोजवारा उडवला आहे. वरून अनधिकृत प्रवासी वाहने, रिक्षांची आणि हातगाड्यांची मोकाट पार्किंग असल्याने वाहतूककोंडीत आणखीनच भर पडत आहे. या गोंधळात वाहतूक मोकळी होणार कशी, असा संताप व्यक्त केला जात आहे.
चाकण येथील तळेगाव-चाकण, चाकण-शिक्रापूर, पुणे-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. तळेगाव चौकात मार्गाचे दोन्ही बाजूंनी रुंदीकरण करण्यात आले. डांबरीकरण करण्यात आले. सांडपाणी वाहिनीची कामे काही ठिकाणी करण्यात आली. चाकण-शिक्रापूर मार्गावरही माणिक चौकाजवळ सांडपाणी वाहिनीचे काम करण्यात येत आहे तसेच दोन्ही बाजूंनी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येऊन डांबरीकरण करण्यात येत आहे. परंतु डांबरीकरण ज्या ठिकाणी झालेले आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या शेजारील ज्या लोकांचे व्यवसाय आहेत त्या लोकांनी डांबरी रस्त्यावर अगदी १० ते १५ फूट मुरुमाचा उंच भराव करून टाकला आहे व आपल्याला ये-जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. त्यामुळे डांबरीकरणाचे नुकसान झालेले आहे. डांबरीकरण झालेल्या ठिकाणी अनधिकृत वाहने लावली जातात. बेकायदा रिक्षा, टेम्पो इतर मालवाहू वाहने लावली जातात त्यामुळे डांबरीकरण करून काही फायदा नाही. अनधिकृत रित्या लोकांनी रस्ता अडवलेला आहे. त्यामुळे अवजड वाहनांना रस्ता अरुंद होतो आहे; पण याकडे कोणाचेच लक्ष नाही. ज्या ठिकाणी डांबरीकरण झालेले आहे त्या डांबरीकरणावर माणिक चौकात हातगाडी वाले, पथारीवाले बसतात त्यांनी रस्ता अडवला आहे म्हणून त्यांच्या व्यवसायासाठी रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण केले ते अनधिकृत अतिक्रमणांसाठी आहे का, असा ही सवाल नागरिकांचा, कामगारांचा व्यावसायिकांचा आहे.


मी माणिक चौकाजवळ तसेच चाकण-शिक्रापूर मार्गावर पाहणी केलेली आहे. डांबरीकरण ज्या ठिकाणी झालेले आहे, त्या ठिकाणी कोणी अतिक्रमण करू नये. ज्यांनी डांबरीकरण रस्त्यावर मुरूम टाकून त्यांच्या दुकानाकडे जाण्यासाठी रस्ते केलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- दिलीप शिंदे, उपअभियंता, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com