चाकणच्या विकासासाठी निधी देणार : एकनाथ शिंदे
चाकण, ता. १ : ‘‘मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे. चाकणच्या विकासासाठी मी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलेला आहे. त्यामुळे चाकणची विकासाची कामे झालेली आहेत, यापुढेही मी निधी देईल. नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, तसेच नगरसेवकपदाच्या उमेदवारांना चाकणच्या विकासासाठी विजयी करा,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
चाकण (ता. खेड) येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातून रॅली काढली. त्यानंतर येथील महात्मा फुले चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘लाडक्या बहिणी व भाऊ शिवसेनेला मतदान करतील व शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे व नगरसेवकपदाचे उमेदवार निवडून येतील.’’
यावेळी शिवसेनेचे नितीन गोरे, भगवान पोखरकर, अतुल देशमुख, प्रकाश वाडेकर, राजेंद्र गोरे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे, नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

