उमेदवारांनो जागते रहा, रात्र वैऱ्याची
चाकण ,ता. १: नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होणार आहे. सोमवारी (ता. १) प्रचाराचा शेवट झाला आहे. परंतु रात्रीत मोठ्या गडबडी मोठ्या सेटलमेंट होत आहेत. उमेदवार दुसरा उमेदवार काय करतो त्याचे कार्यकर्ते काय करतात याच्यावर आपले काही कार्यकर्ते ठेवून फिल्डिंग लावत आहे. त्यामुळे ‘उमेदवारांनो जागते रहा रात्र वैऱ्या’ची आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. रोख पैशाचे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू आहे .गेल्या सहा दिवसांपासून पैशाचे वाटप सुरू आहे. एका मताला दहा हजार रुपयांपासून वीस हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे त्यामुळे मतदारांची चांगली चांदीच झाली आहे. मतदार, कार्यकर्ते यांच्यात कोणी किती भाव दिला याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे उमेदवारामध्ये मते विकत घेण्यासाठी चढाओढ झालेली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले की,‘‘आमची भरारी पथके आहेत त्यामुळे जेथे कोणाचे पैसे वाटप सुरू आहे त्याबाबत काही तक्रारी आल्यास आम्ही तत्काळ कारवाई करणार आहोत. पोलिसांची भरारी पथके यावर निरीक्षण ठेवून आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

