चाकणला ९७० जणांनी दाबले ‘नोटा’चे बटण

चाकणला ९७० जणांनी दाबले ‘नोटा’चे बटण

Published on

चाकण, ता.२१ : खेड तालुक्यातील चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत ९७० मतदारांनी कोणताच उमेदवार पसंत नाही यासाठी ‘None of the above’ असे म्हणतं नोटाला मत दिले आहे. त्यामुळे मतदाराची पसंती दिवसेंदिवस ‘नोटा’लाही वाढते आहे, असे चित्र आहे.
चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत सुमारे २४ हजार ६०५ एकूण मतदान झाले. त्यापैकी नगराध्यक्ष पदाच्या मतदानात २०५ मतदारांनी नोटाला पसंती दिली. कोणताच उमेदवार पसंत नसेल तर मतदान यंत्रावर सर्वांत खाली एक बटण असते ते दाबले तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असे म्हणून मत देता येते.‘नोटा’कडे मतदारांचा कल २०१७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून वाढू लागला आहे. ‘नोटा’ हा मतासाठी मतदार त्याच्या विचाराच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडतो. त्यामुळे मतदाराची नाराजी व्यक्त होते. नोटामुळे मतदारांचा कोणत्याही राजकीय पक्षावर तसेच उमेदवारावर विश्वास नसल्याचे चित्र उभे राहते. चाकण येथील एकूण १२ प्रभागांत नोटाला मतदान झालेले आहे. त्यामुळे एकाही प्रभागात नोटाला मतदान झाले नाही असे नाही, त्यामुळे मतदार आपले विचार ईव्हीएमवर ‘नोटा’च्या माध्यमातून व्यक्त करतो आहे हे वास्तव आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com