चाकणमध्ये पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अपघात
चाकण, ता. २२ : येथील जुन्या पुणे- नाशिक महामार्गावर चाकणमधील (ता. खेड) चौकात पुणे बाजूकडे वळताना एका अवजड कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली एक दुचाकी चालक तरुण आला. मात्र, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे दुचाकी चालक तरुण सुदैवाने वाचला. पोलिसांनी अवजड वाहन कंटेनर थांबविला आणि पुढच्या चाकाखाली गेलेली दुचाकी बाहेर काढली. ही घटना गुरुवारी (ता. २२) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली.
माणिक चौकात जुन्या पुणे- नाशिक महामार्गावर शिक्रापूर बाजूकडून पुणे बाजूकडे कंटेनर वळताना जागा अपुरी असल्याने समोरून आलेला दुचाकीचालक अगदी कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली गेला. तरुण बाजूला फेकला गेला आणि दुचाकी पुढच्या चाकाखाली ओढली गेली. तेथेच असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिसांनी व इतरांनी आरडाओरडा केला. पोलिसांनी तत्परतेने कंटेनर थांबवला आणि त्या तरुणाला व दुचाकीला बाजूला केले. त्यामुळे मोठा अपघात टळला.
या मार्गावर पथारीवाले, हातगाडीवाले अस्ताव्यस्त बसतात. त्यामुळे अवजड वाहने वळण्यासाठी जागाही उपलब्ध नाही. याठिकाणी सतत अपघात घडत असतात. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
10047
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

