चाकणमधील विषय समित्यांच्या निवडी जाहीर
चाकण, ता. २३ : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चाकण (ता. खेड) नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार गटनेते नितीन गोरे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवड करण्यात आल्या.
या निवडी खालीलप्रमाणे सभापतींची बिनविरोध,बहुमताने निवड झाली. नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार नगराध्यक्षा मनीषा गोरे, नितीन गोरे यांनी केला. चाकण शहराचा सर्वांगीण व गतिमान विकास करण्यासाठी सर्व समिती सभापती व सदस्य यांच्या निवडीमुळे शहरातील नियोजन, पाणीपुरवठा, आरोग्य-स्वच्छता, विकासकामे, शिक्षण-क्रीडा तसेच महिला व बालविकास या क्षेत्रांतील कामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नगराध्यक्षा गोरे यांनी व्यक्त केली.
विषय समित्यांचे सभापती पुढीलप्रमाणे- स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती- नगराध्यक्षा मनीषा सुरेश गोरे, पाणीपुरवठा समिती सभापती- उपनगराध्यक्षा सुवर्णा श्याम राक्षे, आरोग्य व स्वच्छता समिती- मंगेश शिवाजी कांडगे, नियोजन समिती व विकास सभापती- प्रकाश लक्ष्मण गोरे, बांधकाम समिती सभापती- रणजीत सखाराम जरे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती- प्रेम शिवाजी जगताप, महिला व बालविकास समिती- रुपाली राहुल कांडगे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

