चाकण परिसरात शेतकऱ्याकडून मोटारीतून फ्लॉवरची थेट विक्री
चाकण, ता. २४ : औद्योगिक वसाहतीतील कंपनीत दिवसभर हेल्परच काम करायचं, महिन्याला कसाबसा पगार मिळवायचा अन् त्यातून कुटुंब चालवायचं. ही धावाधाव करण्यापेक्षा घरची शेती करायची पण तीही व्यवस्थित. यामुळे सुनील राक्षे यांनी घरची वडिलोपार्जित शेती करण्याकडे लक्ष दिले आणि वर्षभर चालू राहील, अशी फ्लॉवरची शेती केली. सध्या ते मोटारीतून थेट ग्राहकांना फ्लॉवरची विक्री करीत आहेत.
राक्षेवाडी (ता. खेड) येथील राक्षे हे मागील दोन-तीन वर्षांपासून चाकण बाजारात रस्त्याच्या कडेला मोटार लावतात आणि हिरव्यागार, पांढऱ्या शुभ्र फ्लॉवरच्या २०० ते ३०० गड्ड्यांची दररोज विक्री करतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळवितात.
विशेष म्हणजे ग्राहक थेट मोटारीजवळ येऊन फ्लॉवरचे गड्डे विकत घेतात. त्यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार जलद व सोपा होतो. राक्षे या शेतकऱ्याने आधुनिक शेतीतून वर्षभर फ्लॉवरचे उत्पादन घेतले आहे. सुधारित रोपे, पाणी, खतांचे, औषध फवारणीचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्यांना दर्जेदार उत्पादन मिळत आहे. बाजार समितीच्या आवारात भाजी विक्रीसाठी नेल्यास वाहतूक खर्च, हमाली, दलालीचा भार सहन करावा लागतो. थेट विक्रीमुळे हा सर्व खर्च टळत असून, शेतकऱ्याला भाजीचा योग्य बाजारभाव मिळत आहे. ताजी फ्लॉवर, भावही गड्ड्यानुसार वजनानुसार नाही त्यामुळे वीस ते चाळीस, पन्नास रुपयात लहानापासून मोठे गड्डे ग्राहकांना मिळतात.
शेतकरी सुनील राक्षे यांनी सांगितले की, मी कंपनीतील हेल्परची नोकरी सोडली आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून फक्त फ्लॉवरची शेती करत आहे. एक एकरमध्ये दहा, दहा गुंठ्याचे प्लॉट अलटून पालटून करत आहे. फ्लॉवर थेट ग्राहकांना कारमधून विकली जाते. गड्ड्यांच्या आकारानुसार वीस ते पन्नास रुपयापर्यंत गड्डे विकले जातात. वर्षभर ही शेती केल्याने खर्च वजा जाता साधारणपणे एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळते.
10063
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

