चाकणकरांना चिलापी माशांची पसंती

चाकणकरांना चिलापी माशांची पसंती

Published on

चाकण, ता.२७ : चाकण (ता. खेड) येथील परिसरात चिलापी माशांना मोठी मागणी वाढली आहे. सध्या चिलापीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. प्रतिकिलो १०० ते १२० रुपये विकले जाणारे हे मासे चाकणकरांच्या पसंतीस उतरत आहेत.
येथील भीमा, भामा या नदीत चिलापी मासे मिळत आहेत. आदिवासी, कातकरी समाजातील तरुण-तरुणी, महिला ज्येष्ठ नागरिक नदीत मासे पकडण्यासाठी जातात आणि दररोज पाच ते दहा किलो मासे पाट्यात विक्रीसाठी घेऊन येतात. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
चाकण औद्योगीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात राज्यातील तसेच देशातील कामगार वर्ग येथे राहावयास आलेला आहे. त्यामुळे नदीतील व समुद्रातील माशांना मोठी मागणी आहे. प्रामुख्याने चाकण बाजारात नदीतील, गोड्या पाण्यातील चिलापी व इतर माशांना मोठी मागणी आहे, असे मासे विक्रेते तरुण सुनील ठाकर यांनी सांगितले.

चिलापी मासे आम्ही भामा, भीमा नदीत पकडतो. दररोज पाच ते दहा किलो मासे पकडले जातात. जाळ्यातून हे मासे पकडले जातात. तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक हे मासे पकडतात. सकाळी लवकर जायचं दुपारपर्यंत मासे पकडायचे आणि सायंकाळच्या सुमारास पाट्यात हे मासे घेऊन विक्रीसाठी यायचे हा आमचा दररोजचा धंदा आहे. चिलापी मासे साधारणपणे शंभर ते १२० रुपये भावाने प्रतिकिलोला विकले जातात. यातून अममचा उदरनिर्वाह चालतो.
- दीपक वाघमारे, चिलापली विक्रेते

10077

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com