प्रचार संपल्यानंतरही 
समाजमाध्यमांवर खैरात

प्रचार संपल्यानंतरही समाजमाध्यमांवर खैरात

Published on

चाकण, ता. ६ : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रचाराच्या अंतिम मुदतीनंतर प्रचाराच्या समाप्तीनंतरही समाजमाध्यमांवर प्रचाराची सर्रास खैरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. प्रचार थांबवण्याच्या स्पष्ट आदेशानंतरही काही उमेदवार, त्यांचे समर्थक युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम रिल्स, एआय या माध्यमांचा वापर करत आहेत असा आरोप होत आहे. या प्रचारात विरोधी उमेदवारांची बदनामी करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ आणि अपप्रचाराचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
प्रचार बंदीच्या काळात मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी निवडणूक आयोगाने ‘सायलेंस पीरियड’ लागू केलेला असतो. मात्र प्रत्यक्षात हे नियम केवळ कागदावरच आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाज माध्यमावरील प्रचारात उमेदवारांची नावे न घेता तसेच नावे घेऊन काही इशारे, संकेत, जुने व्हिडिओ पुन्हा शेअर करून काहींकडून प्रचार केला जात आहे. काही पोस्ट्समधून मुलाखतीतून खोटे आरोप, अफवा, चुकीची माहिती पसरवून काही उमेदवारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सर्रास होत आहे. समाजमाध्यमांवरील या प्रचार मोहिमेमुळे मतदार मात्र संभ्रमात आहेत. अनेक वेळा बनावट अकाउंट्स, अज्ञात ग्रुप्सच्या माध्यमातून हा अपप्रचार केला जात आहे. निवडणूक आयोगाने समाजमाध्यमांवर नजर ठेवणार असल्याचे म्हटले असले तरी काही जणांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे नियम केवळ प्रशासनानेच नव्हे तर राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, नागरिकांनीही पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण नियम कोणी पाळताना दिसत नाही हे आहे. समाज माध्यमावर प्रचार करून बदनामीची तक्रार आल्यास कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही कारवाई करू असे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com