चाकणमध्ये शिवजयंतीनिमित्त भगव्या झेंड्यांची विक्री
चाकण, ता. १७ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीसाठी स्टॉल उभारून भगवे झेंडे, छोटे बॅच, झेंडे, पताका आदी वस्तू रस्त्यावर विकल्या जात आहेत.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये भगव्या झेंड्यांना मोठी मागणी आहे. या संधीचा फायदा घेऊन स्थानिक व्यावसायिकांनी, तसेच परराज्यातील तरुणांनी, व्यावसायिकांनी विविध आकारांचे झेंडे, पताका शिवरायांचे फोटो असलेले झेंडे विक्रीसाठी ठेवले आहेत.
चाकणमधील मुख्य मार्गावर जागोजागी हे स्टॉल दिसत आहेत. झेंड्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी पहायला मिळत आहे. दरवर्षी शिवजयंतीला झेंड्यांना मागणी वाढते. यंदाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. स्थानिक प्रशासनाने शिवजयंती उत्सव शांततेत पार पडावा यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी बाजार परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. सामाजिक संघटनांनी, मंडळांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, व्याख्याने रक्तदान शिबिरे, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
राजस्थानातील तरुण दीपक कुमार यांनी सांगितले की, ‘‘झेंड्यांच्या विक्रीमुळे रोजगार मिळत आहे. विविध प्रकारचे झेंडे, पताका, बॅच विकतो आहे. अनेकजण मोठी वाहने, मोटारी, दुचाकीवर लावण्यासाठी झेंडे खरेदी करत आहेत. अगदी ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत झेंडे विकले जात आहेत.
10189
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

