चाकण परिसरात विविध कार्यक्रम
चाकण, ता. १९ : चाकण (ता. खेड) व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्था, मंडळे, युवक संघटना, ग्रामस्थ यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शहरातील, गावातील प्रमुख चौक, रस्ते, चौक भगव्या पताकांनी सजवण्यात आले होते. यावेळी शिवप्रतिमा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल- ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत तरुण- तरुणींनी शिवाजी महाराज, शिवकालीन मावळे यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. शहरातील शाळा व महाविद्यालयांतही विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शिवचरित्रावर प्रश्नमंजूषा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
चाकण परिसरात शिवजयंती उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रशासनाच्या, तसेच पोलिसांच्या वतीने योग्य नियोजन केल्याने सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले,अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, संजय सोळंके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

