चाकण नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पास मंजुरी
चाकण, ता. २५ : चाकण नगरपरिषदेच्या २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पास तसेच २०२५-२०२६ च्या सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अर्थसंकल्प मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागामार्फत सादर करण्यात आला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
चाकण नगरपरिषदेमार्फत नागरिकांना सुविधा देण्याकरिता, शासनाचे भांडवली योजना तसेच सर्व विभागा मार्फत प्राप्त सूचना लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नाली दुरुस्ती, नवीन रस्ते व विद्युत व्यवस्था यावर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. तसेच जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रलंबित कामांवर चर्चा करण्यात आली. चाकण नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा संबंधित शुल्क वाढीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आले. शुल्कवाढ नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी अत्यंत आवश्यक असली तरी प्रस्तावित शुल्कवाढ जास्त असल्या कारणाने त्यात उचित वाढ करावी, असे सर्वानुमते चर्चेअंती ठरले. वरील सर्व सूचनांना अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत २०२६-२७ च्या शिलकी अर्थसंकल्पास तसेच २०२५-२६ च्या सुधारित अर्थसंकल्पास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

